ओमायक्रॉनचा आकडा दोन हजारांच्या जवळ! जाणून घ्या ताजी आकडेवारी…

125
ओमायक्रॉनच्या रुग्णांची तपशीलवार नोंद घेताना राज्य आरोग्य विभागाला दररोज मर्यादा येत आहे. एक-दोन दिवसांच्या अंतराने राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सोमवारी नवे १२२ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यात आतापर्यंत १,८६० एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ओमायक्रॉन रुग्णसंख्या दोन हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

राज्यात आता ९०१ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ओमायक्रॉन विषाणूच्या तपासणीसाठी प्रयोगशाळांतील पुरेशा कीट उपलब्ध करणे अजूनही आरोग्य विभागासाठी आव्हानात्मक ठरत आहे. सोमवारी नव्या नोंदीतील १२२ रुग्णांपैकी ८१ रुग्णांची जनुकीय तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, तर ४१ रुग्णांची जनुकीय तपासणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून केली गेली.

१२२ ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील 

पुणे – ४०, मीरा भाईंदर – २९, नागपूर – २६, औरंगाबाद १४, अमरावती – ७, मुंबई- ३
भंडारा, ठाणे आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी एक रुग्ण

( हेही वाचा : आरेतील रॅडिओ कॉलर केलेल्या मादी बिबट्याची गोरेगाव भ्रमंती )

गेल्या काही दिवसांतील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या दरदिवसाच्या नोंदी 

  • सोमवारची ओमायक्रॉन रुग्णांची नवी नोंद – १२२
  • १४ जानेवारी, रविवारी ओमायक्रॉन रुग्णांची नोंद – ८
  • १५ जानेवारी, शनिवारी ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद – १२५
  • १४ जानेवारी शुक्रवारी ओमायक्रॉन रुग्णांची नोंद – २३८
  • १३ जानेवारी गुरुवारी ओमायक्रॉन रुग्णांच्या नव्या नोंदी झाल्या नाहीत.
  • १२ जानेवारी बुधवारी ओमायक्रॉन रुग्णांची नोंद – ८६
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.