राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून ते त्यांच्या संपावर ठाम आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मुंबईच्या कामगार न्यायालयाने बेकायदा ठरवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर आधार मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे महामंडळाला मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा ठरविण्यास महामंडळाने राज्यभरातील कामगार न्यायालयात तक्रार दाखल केल्या आहेत. यासंदर्भात मुंबईच्या कामगार न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यात न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवला. कामगार न्यायालयात एसटी महोमंडळाच्यावतीने अॅड. गुरुनाथ नाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. या निर्णयामुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापर्यंत कामगारांवर केलेली कारवाई वैध ठरणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना या कारवाया मागे घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.
(हेही वाचा –ओमायक्रॉनचा आकडा दोन हजारांच्या जवळ! जाणून घ्या ताजी आकडेवारी…)
आतापर्यंत ११,०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एकूण २६,६१९ कर्मचारी कामावर हजर होते. सुरु आगाराच्या संख्येत वाढ झाली असून २५० आगारांपैकी २२६ सुरू झाले आहेत. तर महामंडळाने सोमवारी ३०४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तर आतापर्यंत ११,०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ६०२९ झाली.
Join Our WhatsApp Community