गे-अ‍ॅपवर ‘सेक्सॉर्शनिस्ट’चा शिरकाव

121

समलैंगिकांसाठी असणाऱ्या ‘गे-अप्लिकेशन’मध्ये सेक्स्टॉर्शन करणाऱ्यानी शिरकाव करून समलैंगिकासोबत संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ तयार करून खंडणी मागणाऱ्या तीन जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या त्रिकुटाने मालाड मालवणीत राहणाऱ्या एका समलैंगिक असणाऱ्या व्यक्तीसोबत ‘गे-अ‍ॅप’ वरून मैत्री करून त्या व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ तयार करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

अनैसर्गिक संबंधाचा व्हिडिओ तयार केला

इरफान फुरकान खान (२६), अहमद फारुख शेख (२४) आणि इम्रान सफिक शेख (२०) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे समलैंगिक नसून देखील या तिघांनी समलैंगिकासाठी असणाऱ्या गे-अ‍ॅप डाऊनलोड करून स्वतःची समलैंगिक असल्याची खोटी माहिती भरून समलैंगिक असल्याचा बनाव केला. त्यानंतर या तिघांनी मालाड मालवणीत परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू समलैंगिक तरुणासोबत ओळख वाढवून मैत्री केली. अनेक दिवस चॅटच्या माध्यमातून संपर्कात असलेल्या या तिघांनी या समलैंगिक तरुणाला भेटण्यासाठी बोलावून त्याला पाच जणासोबत संबंध ठेवण्यास बळजबरीने भाग पाडून त्याला मारहाण करून अनैसर्गिक संबंधाचा व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यानंतर या पाच जणांनी या तरुणाकडे पैशांची मागणी करून या तरुणाचा आयफोन, पैशांचे पाकीट, हिसकावून घेत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आणखी खंडणीची मागणी केली. समलैंगिक तरुणाने कशीबशी या पाच जणांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून थेट मालवणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या पाच जणांपैकी तिघांना अटक केली.

(हेही वाचा गोरेगावमधील खेळण्यांच्या दुकानात BIS चा छापा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.