अखेर पार पडलं पेग्विनचं बारसं…मुंबईकरांना ‘ऑस्कर’ मिळाला…

120

भायखळा येथील राणीबागेत १८ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या पेंग्विनच्या बारशाला अखेर मंगळवारचा मुहूर्त मिळाला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट आणि फ्लिपर या नर-मादी पेंग्विनच्या जोडीच्या मिलनातून जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाला ‘ऑस्कर’ असे नाव दिले. या चार महिन्यांच्या पिल्लाच्या बारशासाचा मुहूर्त याआधी हिवाळी अधिवेशनामुळे फसला होता.

मोल्ट आणि फ्लिपर जोडीच्या पिल्लाचे नामकरण थांबवले

गेल्या वर्षी उद्यानात दुस-यांदा पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म झाला. सुरुवातीला १ मे रोजी डोनाल्ड आणि डेझी या नर-नादी पेंग्विनच्या पिल्लांनी जन्म दिलेल्या नर पेंग्विन पिल्लाचे नाव ‘ओरिओ’ असे ठेवले गेले. या पिल्लाच्या आगमनाची तसेच मोल्ट आणि फ्लिपरच्या पिल्लाच्या आगमनाची माहिती दीड महिन्यानंतर राणीबाग प्रशासनाने दिली होती. ओरिओचे नामकरण त्याच्या आगमानाच्या बातमीसह राणीबाग प्रशासनाने दिले. मात्र मोल्ट आणि फ्लिपर या जोडीचे पिल्लू काही महिन्यांचेच असल्याने तूर्तास त्याचे नामकरणाचा विचार योग्य नसल्याचा निर्णय राणीबाग प्रशासनाने घेतला. यादरम्यान ओरिओ आणि तोपर्यंत नाव न ठरलेल्या पिल्लाच्या संगोपनात त्यांचे पालक व्यस्त राहिले. या पिल्लांच्या तब्येतीबाबतही उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी देखरेख ठेवून होते. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरल्याने त्याचवेळी मोल्ट आणि फ्लिपरच्या पिल्लाचे बारसे करणे राणीबाग प्रशासनाला शक्य झाले नाही. मंगळवारी नव्या बछड्या वाघीणीच्या नामकरणासह मोल्ट आणि फ्लिपरलाही ‘ऑस्कर’ मिळाला.

(हेही वाचा राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव…)

कसे आहेत नवे दोन मुंबईकर पेंग्विन्स ?

नऊ महिन्यांच्या ओरिओला आजूबाजूच्या वातावरणाबाबत खूप उत्सुकता असते. कित्येकदा तो एकटाच फिरत राहतो. पाच महिन्यांच्या ऑस्कर हा मॉल्ट या आपल्या वडिलांप्रमाणेच खूप हुशार आहे. आकाराने तो ओरिओपेक्षाही मोठा दिसतो, अशी माहिती पेंग्विनची देखभाल करणा-या डॉ. मधुमिता काळे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.