पंजाबमध्ये ईडीची छापेमारी, मुख्यमंत्री चन्नींच्या पुतण्यासह १० ठिकाणी धाड

122

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पंजाबमधील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. अवैध वाळू उत्खनन आणि पैशांचा अवैध व्यवहार प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने ज्या ठिकाणी छापे टाकले आहेत त्यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग हनी यांच्या मोहाली येथील निवासस्थानाचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लुधियाना आणि शहीद भगत सिंह नगर येथे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या पुतण्याच्या मालमत्तेच्या ठिकाणीही छापा पडल्याची माहिती आहे. त्याशिवाय मोहालीच्या सेक्टर ७० मध्ये छापेमारी करण्यात आली आहे.

मोहालीसह पंजाबमधील 10-12 ठिकाणी ईडीचे छापे

यापूर्वी विरोधकांनी सीएम चन्नी यांच्या जवळच्या लोकांवर वाळू उत्खननाच्या अवैध धंद्यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. अवैध वाळू उत्खननाच्या संदर्भात ईडीने मोहालीसह पंजाबमधील 10-12 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. ईडीच्या छाप्यात सीआरपीएफच्या महिला पथकासह 8 पथकांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. सीएम चन्नी यांच्या मेहुण्याचे घर असलेल्या मोहालीच्या होमलँड सोसायटीवरही ईडीने छापा टाकला आहे. वाळू उत्खननाचे कंत्राट मिळवण्यासाठी भूपिंदरने पंजाब रियल्टर्स नावाची फर्म स्थापन केल्याचा आरोप आहे. वाळू खाणीचे कंत्राट घेण्यासाठी काळ्या पैशाचा वापर झाल्याचा ईडीला संशय आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होत असताना ईडीने हे छापे टाकले आहेत. अशा स्थितीत या छाप्यांमुळे राज्यात राजकीय खळबळ वाढेल, असे मानले जात आहे.

(हेही वाचा –चिमुरड्यांचा जीव घेणा-या ‘त्या’ दोघींना अखेर न्यायालयानं सुनावली ‘ही’ शिक्षा!)

2018 मध्ये अवैध वाळू उपशावर गुन्हा दाखल

पंजाब पोलिसांनी याआधी 2018 मध्ये अवैध वाळू उपशाच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये फसवणूकीचे 420 कलमही लावण्यात आले होते. पण हे प्रकरण नंतर ईडीने टेकओव्हर केले. सुरूवातीला कुदरजीतचे नाव पुढे आले. पण नंतर मुख्य सूत्रधार भूपिंदर हनी असल्याचे समोर आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.