‘राऊतांनी भाजपला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही’

116

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुरमध्ये एका दलित कुटुंबाच्या घरी जेवण केले. यानंतर याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला होता. तसेच राऊत यांनी मोदींवरही टीका केली होती. यावर दलितांच्या आणि शोषितांच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असे सांगत भाजपच्या राम सातपुते यांनी राऊतांना प्रतिउत्तर दिले आहे.

काय म्हणाले सातपुते?

‘संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आपला तोंडपट्टा चालवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित बांधवाचे पाय धुतले याचा संदर्भ देत भाजपवर टीका केली, भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. संजय राऊतांनी दलितांच्या आणि शोषितांच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असा खोचक सल्ला भाजपच्या राम सातपुते यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

( हेही वाचा : ‘संजय राऊत म्हणजे नटसम्राट’! फडणवीसांनी केले ‘नामकरण’ )

संजय राऊतांना खुले आव्हान

दलितांना समान संधी आणि प्रतिनिधीत्वाचा हक्क भारतीय जनता पक्षाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे दिखावा अथवा देखाव्यासाठी केले नाही. संजय राऊंताच्या पक्षात जेवढ्या आमदारांची संख्या आहे, त्यापेक्षा जास्त दलित बांधव खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. म्हणूनच आमच्या जे पोटात आहे तेच ओठात आहे आणि तेच आमच्या कर्तृत्वात आहे. त्यामुळे संजय राऊतांनी कॉंग्रेसला खूश करण्यासाठी आम्हाला ज्ञान पाजळू नये. तुमच्या पक्षाने किती जणांना प्रतिनिधित्व दिले, हे जाहीर करावे, असे खुले आव्हान राम सातपुते यांनी संजय राऊतांना केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.