कोरोनाचे राज्यात सर्वात जास्त रुग्ण कुठे आहेत? जाणून घ्या…

140

मंगळवारी राज्यातील इतर भागांच्या तुलनेत पुण्यात सर्वात जास्त सक्रीय रुग्णांची संख्या नोंदवली गेली. पुण्यात सध्या ६३ हजार १६९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यातील ही सर्वाधिक कोरोना रुग्णांची आकडेवारी आहे. त्या खालोखाल ठाण्यात ६० हजार ४४० तर मुंबईत ४४ हजार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

एकीकडे राज्यातील दर दिवसाची आकडेवारी आटोक्यात येत असल्याचे सकारात्मक चित्र असताना ठाणे आणि पुण्यात मात्र रुग्णवाढ दिसून येत आहे. सोमवारी ठाण्यात राज्यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या नोंदवली गेली. राज्यात मंगळवारी तब्बल वीस दिवसानंतर नव्या नोंदणीची रुग्णसंख्या चाळीस हजारांच्या खाली आली. मंगळवारी राज्यात ३९ हजार २०७ नवे कोरोनाचे रुग्ण नोंदवले गेले, तर ३८ हजार ८२४ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरातील सक्रीय रुग्णांमध्ये सोमवारपासून केवळ हजारांच्या संख्येनेच वाढ होत आहे.

(हेही वाचा मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद!)

५३ रुग्णांनी जीव गमावला

मृत्यूदर कमी असला तरीही मंगळवारी ५३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सर्वाधिक मृत्यू मुंबईत दिसून आले. मुंबईत ७ रुग्णांनी आपला जीव गमावला. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवलीमध्ये ५, वसई विरारमध्ये ४, पनवेलमध्ये १, पुण्यात ग्रामीण भागांत३, नाशकात २, पुणे शहरांत २, पिंपरी-चिंचवडमध्ये १, सोलापूरात ३, साता-यात ४, कोल्हापूरात ४, सांगलीत ४, रत्नागिरीत ३, सिंधुदुर्ग, लातूर, बीड, गडचिरोलीत प्रत्येकी २अकोला आणि गोंदियात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात मंगळवारी ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. सध्या राज्यात ८५९ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • राज्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या – ७२ लाख ८२ हजार १२८
  • राज्यात आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – ६८ लाख ६८ हजार ८१६
  • राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या – २ लाख ६७ हजार ६५९
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.