कृत्रिम सूर्यानंतर चीनने ‘कृत्रिम चंद्र’ही बनवला आहे. कृत्रिम चंद्र बनवण्यामागचे कारण म्हणजे गुरुत्वाकर्षणाशी संबंधित एक प्रयोग करणे, ज्यामध्ये कृत्रिम चंद्रापासून गुरुत्वाकर्षण पूर्णपणे काढून टाकले जाते. यामध्ये चुंबकीय शक्तीची चाचणी घेण्यात आली, जेणेकरून भविष्यात चुंबकीय शक्तीवर चालणारी वाहने आणि वाहतुकीच्या नवीन पद्धतींचा शोध घेता येईल आणि चंद्रावर मानवी वसाहती करता येतील.
असा असणार प्रतिचंद्र
चिनी शास्त्रज्ञांनी नुकताच एक छोटासा प्रयोग केला आहे. यानंतर, या वर्षाच्या अखेरीस, एक शक्तिशाली चुंबकीय शक्तीचा व्हॅक्यूम चेंबर बनविला जाईल. ज्याचा व्यास 2 फूट असेल. जेणेकरुन बेडकाला त्यातील गुरुत्वाकर्षण पूर्णपणे काढून हवेत उडवता येईल. तथापि, बेडूक यापूर्वी अशा व्हॅक्यूम चेंबरमध्ये सोडण्यात आले आहे. चायना युनिव्हर्सिटी ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजीचे जिओटेक्निकल अभियंता ली रुइलिन यांनी सांगितले की, व्हॅक्यूम चेंबर चंद्राच्या पृष्ठभागाप्रमाणे दगड आणि धूळांनी भरलेले असेल. चंद्राचा असा पृष्ठभाग पृथ्वीवर प्रथमच तयार होणार आहे. याचा एक छोटासा प्रयोग आम्ही केला आहे, जो यशस्वी झाला आहे. पण पुढील प्रयोगात कमी गुरुत्वाकर्षण शक्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी हा प्रयोग दीर्घकाळ चालवण्याची योजना आहे.
(हेही वाचा – भारताच्या आघाडीच्या १०० कंपन्यांमध्ये ‘ही’ कंपनी ठरली No.1!)
हुबेहूब चांद्रभूमीची निर्मिती
चिनी शास्त्रज्ञांनी जिआंग्झु प्रांतातील क्षुझोऊ या शहरानजीक हुबेहूब चांद्रभूमीची निर्मिती केली आहे. या ठिकाणी चंद्रासारखे वातावरण तयार करण्यात आले असून येथे गुरुत्वाकर्षण गायब होते. आंद्रे जेईम या रशियन शास्त्रज्ञाने असल केलेल्या प्रयोगावरून चीनला ही कृत्रिम चंद्राची कल्पना सुचली. पृथ्वीवर चंद्रासारखे वातावरण निर्माण करून परिस्थिीतीचा अभ्यास करण्याचा प्रयोग आखून चीनने प्रत्यक्षात आणला.
Join Our WhatsApp Community