भारताच्या आघाडीच्या १०० कंपन्यांमध्ये ‘ही’ कंपनी ठरली No.1!

154

आघाडीची एफएमसीजी कंपनी असलेली गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने २०२१ मधील शाश्वतता आणि सीएसआर उपक्रमांमध्ये भारताच्या आघाडीच्या १०० कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. फ्युचर स्केपने राबविलेल्या आणि सीएसआर जर्नलने प्रकाशित केलेल्या सर्वेक्षणावर आधारित हे मानांकन ठरले आहे. २०२१ साठी शाश्वत विकास ध्येयाशी (SDGs) सुसंगत अशी आपली व्यवसाय उद्दिष्टे ठेवणाऱ्या १०० कंपन्यांची यादीचे विश्लेषण यात करण्यात आले आहे.

२०२१ मधील शाश्वतता आणि सीएसआर उपक्रमांसाठीच्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांच्या रीस्पोन्सिबल बिझनेस रँकिंग्ज वरून असे दिसून आले की, आघाडीच्या १०० कंपन्यांपैकी साधारण ८०% कंपन्या त्यांचे शाश्वत विकास ध्येय SDGs त्यांच्या जबाबदार व्यवसाय कृतींमध्ये समाविष्ट करते. अग्रणी असलेल्या पहिल्या २५ कंपन्यांनी त्यांची व्यवसाय उद्दिष्टं SDGs बरोबर सुसंगत ठेवली आहेत. पहिल्या १० मानांकित कंपन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी, रसायने, जीवन विज्ञान, वस्त्रोद्योग, ऊर्जा, पोलाद आणि खाणकाम अशा विविध क्षेत्रातील उद्योग आहेत. इन्फोसिस, विप्रो, टाटा केमिकल्स लिमिटेड, आयटीसीएल लिमिटेड, ज्युबीलंट लाईफ सायन्सेस लिमिटेड, ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड, वेदांत लिमिटेड आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेड यासारख्या कंपन्यांमधून जीसीपीएलला अग्रमानांकन मिळाले आहे.

पहिल्यांदा मिळवला प्रथम क्रमांक 

२०२०-२१ या आर्थिक वर्षांत सीएसआर उपक्रमांवर ३४.०८ कोटी रुपये खर्च करून जीसीपीएलने पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. मार्च २०२० मध्ये कोव्हीड १९ महामारीला सुरुवात झालेली असताना तातडीच्या मदत आणि उपाययोजनांसाठी कॉर्पोरेट पाठबळाची तातडीची गरज कंपनीने ओळखली. जीसीपीएलने २.७७ लाखाहून अधिक भारतातील सर्वाधिक गरज असणाऱ्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सीएसआर अंदाजपत्रकापैकी ६३%भाग वळविला आणि ९,००० हून अधिक लघुउद्योजकांना मध्यम ते दीर्घकालीन पाठिंबा द्यायला सुरुवात केली. मार्च २०२१ पर्यंत, १००० हून अधिक लोकांनी त्यांचा व्यवसाय पुन्हा वसवला किंवा त्यांना हक्काचा व्यवसाय मिळाला.

(हेही वाचा – अवघ्या ३ वर्षांत सर्वाधिक विस्तार! ‘या’ डिजिटल पेमेंट बँकेच्या नावे नवा विक्रम)

२०२५ पर्यंत १३ दशलक्षाहून अधिकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे ध्येय

या मानांकन प्राप्तीसंदर्भात बोलताना जीसीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले, “गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये आपल्या सृष्टीचा आणि आपल्या लोकांचा लाभ करून देत अधिक शाश्वत भविष्याच्या उभारणीसाठी आम्ही बांधील आहोत. २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात, कोव्हीड १९ महामारीचा संपूर्ण जगात फैलाव झालेला असताना आम्ही तातडीच्या दिलासादायक उपाययोजना आणि मध्यम ते दीर्घकालीन पुनर्वसन मदतीवर आमचे लक्ष केंद्रित केले. कमी उत्पन्न गट आणि वंचित समाज यांच्यामध्ये लसीकरणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आता आम्ही स्थानिक आरोग्यसुविधा पुरवठादारांबरोबर भागीदारी केली आहे. मार्च २०२२ पर्यंत भारतातील १,००,००० लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय आहे. पुढे वाटचाल करताना, आमची सीएसआर उद्दिष्टे ठळक आहेत आणि २०२५ पर्यंत १३ दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.