तुमच्या वाहनाला तर ई-चलन आलं नाही ना! राज्यात एका महिन्यात इतके ई चलन जारी

एका महिन्यात वाहन चालकांना दंडापोटी १४ लाख २७ हजार ई-चलन जारी

125
राज्यात वाहतूक विभागाने दंड आकारण्यासाठी ई- चलन सुविधा सुरू केलेली आहे. मात्र वाहन चालक ई चलन सेवेला गंभीरपणे घेत नसल्याचे थकीत दंडाच्या आकडेवारी वरून समोर येत आहे. राज्यात नुकताच लागू करण्यात आलेल्या सुधारित मोटार वाहन कायदा अंतर्गत एका महिन्यात वाहन चालकांना दंडापोटी १४ लाख २७ हजार ई-चलन पाठवण्यात आले आहे. त्यापैकी केवळ २ लाख १५ हजार वाहन चालकांनी दंडाची रक्कम भरली असली तरी १२ लाख जणांकडून दंडाची रक्कम येणे बाकी आहे.

दंडाच्या रक्कमेत पाच ते दहा पटीने वाढ

राज्यभरात सुधारित मोटार वाहन कायदा ११ डिसेंबर २०२१ मध्ये लागू करण्यात आलेला आहे. या सुधारित कायद्यात दंडाची रक्कम पाच ते दहा पटीने वाढवण्यात आलेली आहे. हा कायदा लागू करण्यात आल्यानंतर राज्यात ई -चलनाद्वारे आकारली जाऊ लागली आहे. ई चलनाद्वारे आकारण्यात आलेली रकमेची वसुली करतांना मात्र वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. वाहन चालक या ई चलनाला गंभीरपणे न घेता दंडाची रक्कम भरणे टाळत असल्याचे मागील एका महिन्याच्या आकडेवारीत समोर आले आहे.

९३ कोटी रुपयांची वसुली अद्याप बाकी

११ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२२ या एक महिन्याच्या कालावधीत राज्यातील विविध वाहतूक विभागाकडून  सुधारित मोटर वाहन कायदा अंतर्गत १४ लाख २७ हजार नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ई चलनाच्या माध्यमातून दंड आकारण्यात आलेला असून या दंडाची रक्कम १०४. ६९ कोटी एवढी आहेत.  त्यापैकी केवळ २ लाख १५ हजार ई चलनाचा दंडाची वसुली म्हणजे ११ कोटी ६७ लाख  करण्यात आलेली आहे. ९३ कोटी रुपयांची वसुली अद्याप बाकी आहे. ही दंडाची रक्कम केवळ एका महिन्याची असल्याचे एका वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले आहे, हा दंड वसूल करण्यासाठी वाहन चालकाच्या घरी दंडाची रक्कम भरण्यासाठी समन्स  पाठवण्यात येत असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.