दापोली नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता, मंडणगडमध्ये अपक्षांवर मदार

120

रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता. १८ जानेवारी) दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडललेल्या दापोली आणि मंडणगड नगर पंचायतींपैकी दापोलीत महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे, तर मंडणगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर विकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांची चार अपक्ष नगरसेवकांवर मदार आहे. दोन्ही नगरपंचायतींमध्ये १७ नगरसेवक निवडून द्यायचे होते. दापोलीत शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला ८, तर अपक्षांना २ जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

प्रभागनिहाय विजेते असे –

  • प्रभाग १ – आरिफ मेमन,
  • प्रभाग २ (अहमदनगर) – नोशिन गिलगीते,
  • प्रभाग ३ (आझाद नगर) – खालीद रखांगे,
  • प्रभाग ४ (खोंडा) मेहबूब तळघरकर,
  • प्रभाग ५ (गाडीतळ) – ममता मोरे,
  • प्रभाग ६ (पोस्टाची आळी) – साधना बोथरे,
  • प्रभाग ७ (झरी आळी) – कृपा घाग,
  • प्रभाग ८ (फॅमिली माळ) – रवींद्र क्षीरसागर,
  • प्रभाग ९ – अजिम चिपळूणकर (शिवसेना),
  • प्रभाग १० (शिवाजी नगर) – शिवानी खानविलकर (शिवसेना),
  • प्रभाग ११ (काळकाई कोंड चोरगेवाडी) – अन्वर रखांगे (राष्ट्रवादी काँग्रेस),
  • प्रभाग १२ (बुरूडवाडी, बौद्धवाडी) – रिया सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस),
  • प्रभाग १३ (वरची बुरूड आळी) – प्रीती शिर्के (अपक्ष),
  • प्रभाग १४ (भारत नगर) – संतोष कळकुटके (राष्ट्रवादी काँग्रेस),
  • प्रभाग १५ (नागरमुळी) अश्विनी लांजेकर (राष्ट्रवादी काँग्रेस),
  • प्रभाग १६ जया साळवी (भाजप),
  • प्रभाग १७ (वडाचा कोंड) विलास शिगवण (राष्ट्रवादी काँग्रेस).

मंडणगडमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. सात जागा मिळविलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला असून त्याखालोखाल शहर विकास आघाडीला ६ जागा मिळाल्या आहेत. सत्तारूढ होण्यासाठी या दोन प्रमुख पक्षांची मदार निवडून आलेल्या अपक्ष ४ नगरसेवकांवर राहणार आहे.

(हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी)

मंडणगडमधील प्रभागनिहाय विजेते असे –

प्रभाग १ (आदर्श नगर) सुमित्रा निमदे (अपक्ष) आणि सोनल बेर्डे (अपक्ष) यांना समसमान ६२ मते मिंळाल्याने चिठ्ठीवर अपक्ष उमेदवार सोनले बेर्डे विजयी, प्रभाग २ (बोरीचा माळ) – सेजल गोवळे (अपक्ष). प्रभाग ३ ( केशव शेठ लेंडे नगर) – प्रियांका लेंडे (राष्ट्रवादी). प्रभाग ४ (शिवाजी नगर) – मुश्ताक दाभिळकर (अपक्ष). प्रभाग ५ (साईनगर) – योगेश जाधव (अपक्ष). प्रभाग ६ (दुर्गवाडी) – सुभाष सापटे (राष्ट्रवादी). प्रभाग ७ (सापटेवाडी) – नीलेश सापटे (अपक्ष). प्रभाग ८ (दुर्गवाडी) – राजेश्री सापटे (राष्ट्रवादी). प्रभाग ९ (भेकतवाडी) – प्रमिला किंजळे (अपक्ष). प्रभाग १० (कोंझर) – मुकेश तलार (राष्ट्रवादी). प्रभाग ११ (धनगरवाडी) – विनोद जाधव (अपक्ष). प्रभाग १२ (तुरेवाडी-कुंभारवाडी) – मनीषा हातमकर (राष्ट्रवादी). प्रभाग १३ (बौद्धवाडी) – आदेश मर्चंडे (अपक्ष). प्रभाग १४ (बौद्धवाडी) – रेश्मा मर्चंडे (अपक्ष). प्रभाग १५ (गांधी चौक) – वैशाली रेगे (अपक्ष). प्रभाग १६ (गांधी चौक) वैभव कोकाटे (राष्ट्रवादी). प्रभाग १७ घतुरेवाडी-सोनारवाडी) – समृद्धी शिगवण (राष्ट्रवादी).

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.