पवार पावसात भिजले, लोकांची मनं विरघळली, पण आश्वासनांचे काय?

138

निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसात भिजत भाषण सुरु ठेवले आणि साताऱ्यात उदयन राजे पराभूत झाले. पवारांच्या या पाऊस केमिस्ट्रीची चर्चा जोरदार सुरु झाली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यांची आठवण करून देत राष्ट्रवादीला जोरदार टोला दिला आहे.

नगरपंचायतीच्या निकालाने हुरळून जाऊ नका!

शरद पवार पावसात भिजले त्यांच्या भिजण्याने लोकांची मनं विरघळली आणि त्यांनी राष्ट्रवादीला सत्ता दिली, मात्र त्यांच्या भिजण्याप्रमाणे त्यांनी दिलेली आश्वासने ही विरघळली आहे, त्याचा जाब स्वाभिमानी शेतकरी संघटना विचारणार आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देत असताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीने हुरळून जायचे कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत साधारण राज्यात ज्यांचे सरकार असते त्यांचे लोक विजयी होतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही, असा टोला राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

(हेही वाचा सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या निवडणुकांचे निकाल कळवा!)

महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा

तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे म्हणून हे लोक त्यांच्याकडे गेले आहे. यावरुन राज्याचे सार्वमत सांगता येणार नाही, महाविकास आघाडीने त्यांचा कारभार सुधारला नाही तर त्यांना धोक्याची घंटा निश्चित आहे, असा इशाराही शेट्टींनी दिला. तसेच सांगलीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता राखली. सगळे विरोधात असताना रोहित लढला इतर भागातील तरुणांनी पण रोहित यांचा आदर्श घ्यावा, प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद, क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावे, असे म्हणत राजू शेट्टी यांनी रोहित पाटील यांचे अभिनंदन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.