फिरायला जाताय? राज्यात ‘या’ जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद!

129

राज्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यात थंडीची मजा अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक नाशिकला भेट देतात. नाशिकमध्ये वाढती कोरोना रुग्ण संख्या व बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांची वाढणारी गर्दी बघता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी घातली आहे. आजपासून ही अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच नाशिककरांनी कोरोना त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई

जिल्ह्यात मागील महिन्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या तीनशे होती. पण मागील वीस दिवसांत हा आकडा साडे आठ हजारांच्या घरात गेला आहे. ते बघता पर्यटनस्थळ बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने मनोरंजन संग्रहालये, प्राणी संग्रहालये, वस्तू संग्रहालये, किल्ले, इतर सशुल्क संग्रहालये ही ठिकाणे यापूर्वीच बंद केली होती. आता जिल्हा प्रशासनाने खुली पर्यटनस्थळे बंदचे अधिकृत आदेश काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापण कायद्यांर्गत कारवाईचा इशाराही दिला आहे.

(हेही वाचा नगर पंचायत निवडणूक : महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचा ‘विकास’ सेना-काँग्रेसचे नुकसान)

नाशिकमधील या पर्यटन स्थळांवर बंदी

ब्रह्मगिरी, अंजनेरी, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, साल्हेर किल्ला, रामशेज किल्ला, भास्कर गड, पहिने, भावली धरण, वैतरणा धरण, गंगापूर धरण इत्यादी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.