थंडीसोबत वाढतंय प्रदूषण, महाराष्ट्राची हवा खराब!

236

भारताची राजधानी हवा प्रदूषणाठी नेहमीच चर्चेत असते, पण यावेळी मात्र सीएसईने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हवा वेगाने प्रदूषित होत आहे. या राज्यांतील प्रदूषणाची पातळीही वाढत आहे. म्हणजेच थंडीसोबत हवासुद्धा खराब होत आहे.

मुंबईत होतंय अधिक प्रदूषण

हिवाळ्यात धुलिकण वातावरणात अडकून पडतात आणि प्रदूषण वाढते. पश्चिम भारतात उत्तरेइतका हिवाळा नसला, तरी समुद्र जवळ असल्याने आणि इतर काही कारणांमुळे येथेही प्रदूषण वाढत असल्याचे दिसून आले आहे. सीएसईने महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील 2019 ते 2021 या कालावधीत प्रदूषणाचा अभ्यास केला. त्यात लाॅकडाऊनच्या काळात हवेच्या दर्जात झालेली सुधारणा अल्पजीवी ठरल्याचे दिसून आले आहे. काही शहरांमध्ये 2019 मधील प्रदुषणापेक्षाही बिकट परिस्थिती झाली आहे. मुंबईत खराब हवा असण्याच्या दिवसांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून, हवा स्वच्छ असणा-या दिवसांच्या संख्येत 20 टक्क्यांनी घट झाली आहे.

(हेही वाचा :महाराष्ट्रातील ‘या’ चार शहरांचे पदपथ देशात ठरले अव्वल! )

महाराष्ट्रातील स्थिती

देशातील सरासरी प्रदूषणाच्या पातळीपेक्षा महाराष्ट्रात प्रदूषणाची वार्षिक पातळी कमी असली, तरी खराब आणि अतिखराब हवा असणा-या दिवसांची संख्या वाढली आहे. डिसेंबरच्या अखेरीपासून राज्यातील शहरांमधील हवा खराब होण्यास सुरुवात होते. हिवाळ्यातील वातावरणाचा सर्वाधिक परिणाम मुंबई परिसरातील हवेवर होत असल्याचे, अहवालात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.