23 जानेवारी (रविवारी) मध्ये रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन-जलद मार्गावर 14 तासांचा, तर अप जलद मार्गावर दोन तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावरी अनावश्यक ठरलेल्या धीम्या मार्गांना सध्याच्या जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्राॅसओवरची कामे करण्यासाठी हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
असा आहे ब्लाॅक
23 जानेवारीच्या (रविवारी) दुपारी 12.30 वाजेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर 2 तासांसाठी ब्लाॅक असणार आहे. तर 23 जानेवारीच्या मध्यरात्री 1.20 वाजेपासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा ब्लाॅक ठेवण्यात आला आहे. या ब्लाॅक कालावधीमध्ये दिवा -ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर गाड्या धावतील. ब्लाॅक सुरु होण्यापूर्वी 22 जानेवारी रोजी दादर येथून रात्री 11.40 वाजेपासून ते 23 जानेवारी रोजी मध्यरात्री पहाटे 2 वाजेपर्यंत सुटणा-या जलद उपनगरी व मेल, एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. 23 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 नंतर लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन कल्याणकडे जाणा-या डाऊन मेल, एक्सप्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत.
( हेही वाचा :थंडीसोबत वाढतंय प्रदूषण, महाराष्ट्राची हवा खराब! )
गाड्या धिम्या मार्गावर वळवणार
ब्लाॅक सुरु झाल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेपासून ब्लाॅकचा वेळ पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणा-या उपनगरीय व मेल, एक्सप्रेस गाड्या मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. कल्याणकडे जाणा-या मेल, एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. ठाण्यातील प्रवाशांना दादर, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरुन या गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे.