‘निर्भया’मुळे ‘भय’ संपले! 4 महिन्यांत मुलींची छेड काढणाऱ्या 25 टपोरींना बदडले

120

साकीनाक्यात गेल्या वर्षी माणुसकीला काळिमा फासणारा बलात्कार आणि हत्येची घटना घडली होती. पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकून तिचा जीव घेण्यात आल्याने अख्ख्या महाराष्ट्रात या प्रकाराने खळबळ उडाली होती. या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सप्टेंबर २०२१ म्हणजे चार महिन्यांपूर्वी ‘निर्भया पथक’ची नियुक्ती सर्व पोलीस ठाण्यात केली. या पथकाकडून छेडछाड प्रकरणात २५ टपोरींना गेल्या चार महिन्यात कायद्याचे फटके देण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे.

(हेही वाचा –राज्यात शाळा, महाविद्यालयं सोमवारपासून होणार सुरू?)

निर्भया पथकाने कधी अल्पवयीन मुलीमागे ‘तेरे पे दिल आया है’ म्हणत पाठलाग करणाऱ्या रोमियोला धडा शिकविण्यात आला. कधी पैशांसाठी डांबण्यात आलेल्या मुलींची सुटका या ‘निर्भया ने केली, तर अॅसिड हल्ल्याच्या धमकीने अल्पवयीनांवर होणारा अत्याचार रोखला. दिवसरात्र गस्त घालत आणि मोबाइल क्रमांकावर तसेच फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर येणाऱ्या तक्रारींना ‘निर्भया’ अटेंड करत आहे.

अत्याचाराला तोंड देण्यासाठी पथक सक्षम

मुंबई पोलीसांकडून असे सांगण्यात आले की, महिलांच्या सुरक्षेसाठीच आम्ही हे पथक तयार केले असून, प्रत्येक पोलीस ठाण्यात ते सध्या स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्यात एक अधिकारी, २ कर्मचारी आणि चालकासोबत एक वेगळा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार, महिलांवरील अत्याचाराला तोंड देण्यासाठी हे पथक सक्षम आहे.

निर्भयाकडून करण्यात आलेल्या कारवाया

  • आत्महत्येपासून परावृत्त (०४)
  • छेडछाड तक्रारीत केलेली मदत (२५)
  • वयोवृद्धांना केलली मदत (१८)
  • मनोरूग्ण महिलांना मदत (०५)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.