यंदाचा प्रजासत्ताक दिन अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून यंदा प्रजासत्ताक दिनाची परेडसुद्धा खास असणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीच्या राजपथावर पहिल्यांदाच 75 एअरक्राफ्ट उड्डाण करताना दिसणार आहेत. यामध्ये 5 राफेल विमानांचासुद्धा समावेश असणार आहे. सोबतच, पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी निमंत्रितांच्या यादीमध्ये ऑटोरिक्षा चालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कामगार आणि आघाडीचे कामगार यांचा समावेश करण्यात आला आहे.
सामान्यांना विशेष स्थान
संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांना कधीही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्याची संधी मिळत नाही, त्यांना संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत ऑटोरिक्षा चालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कामगार आणि आघाडीचे कामगार यांचा समावेश आहे.
( हेही वाचा :काँग्रेसकडून गोव्याची प्रतिमा मलीन, टीएमसी हिंदू विरोधी, आप खोटारडी! )