पुण्यातील बालेवाडी परिसरातून दहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण या चिमुरड्याचे अपहरण झाले होते. परंतु तरीही स्वर्णव आपल्या आई-वडिलांकडे परतला. मात्र तरीही कुटुंबावर शोककळा पसरली.
स्वर्णवच्या आत्याचा झाला अपघाती मृत्यू
एकीकडे चव्हाण पती-पत्नीच्या मनात आनंद असतानाच दुसरीकडे कुटुंबायांवर शोककळा पसरली आहे. स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोहोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेडहून आपल्या भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू झाला. सुनीता संतोष राठोड (वय ३६) यांचा नगर महामार्गावर चारचाकीच्या अपघातात मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले व पती जखमी झाले आहेत. समर राठोड (वय १४), अमन राठोड (वय ६) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून सुनीता राठोड यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
(हेही वाचा प्रतिकात्मक का होईना लोहगडावर उरुस झालाच! दुर्गप्रेमींना दिल्या नोटीस)
Join Our WhatsApp Community