महाराष्ट्र हे पुढारलेले आणि प्रगत राज्य म्हणून समजले जाते, पण राज्यात असे एक गाव आहे, जिथे एक आठवडा दिवसा वीज पुरवठा केला जातो, तर दुसऱ्या आठवड्यात रात्रभर वीज पुरवठा केला जात आहे. यामुळे राज्य आजून किती मागास आहे हे दिसते.
कांदा लागवडीसाठी आठवडाभर दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी
रांजणगाव गणपती-शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत कांदा लागवडी सुरू राहण्याची शक्यता आहे. या भागात कांदा लागवडी कोरड्यात केल्या जात नसल्याने दिवसा पाणी देऊन लागवडी केल्या जातात. परंतु, महावितरणकडून एक आठवडा दिवस पाळी व दुसऱ्या आठवड्यात रात्र पाळीत वीजपुरवठा केला जात आहे. याचा परिणाम थेट कांदा लागवडीवर होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत दिवस पाळीत वीजपुरवठा करण्याची मागणी दहिवडी (ता. शिरूर) येथील शेतकरी शरद इंगळे यांनी निवेदनाद्वारे केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांच्याकडे केली आहे.
(हेही वाचा बायोमेट्रिक हजेरी सक्तीचीच!)
शेतकऱ्याने दिले निवेदन
एक आठवडाभर दिवसपाळीत वीजपुरवठा होत असल्याने त्याच आठवड्यात सर्व शेतकरी कांदा लागवड करण्याचे नियोजन करतात. परिणामी मजूर टंचाईचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. जास्तीचे पैसे देऊन दुसऱ्या भागातून मजूर आणावे लागत आहेत. त्यात गाडी भाडे द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
Join Our WhatsApp Community