पुण्यात डेमू रेल्वे रुळावरुन घसरली आणि…

128

पुणे रेल्वे स्थानकावर डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कसा घडला अपघात

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी साडे नऊच्या सुमारास डेमु रेल्वेचा अपघात घडला. ज्या रेल्वेचा अपघात झाला आहे ती पुणे – दौंड दरम्यान धावते.  ही रेल्वे स्थानकावर शंटींग करताना हा अपघात घडला. त्यामुळे पुणे – दौड जाणारी सकाळची डेमु रद्द करावी लागली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. पुणे – दौंड दरम्यान धावणारी ही रेल्वे ट्रेन यार्डात जाताना हा अपघात घडला. शंटींग करताना यात प्रवाशी नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहाणी झाली नाही.

(हेही वाचा –सीजीएसटी आयुक्तालयाची मोठी कारवाई! मुंबईत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड)

पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघाताची घटना

गेल्या 13 जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघाताची मोठी घटना घडली होती. गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील डोमाहानीजवळ रूळावरून घसरली. या अपघातात अनेक जण जखमी झाले होते. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान पोहोचले असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी परिसरात मैनगुडी येथे बिकानेर एक्स्प्रेसचे तब्बल 12 डब्बे रूळावरून घसरल्याने मोठा अपघात घडला होता. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.