नेटवर्क समस्या, तरी गावाचा विकास आराखडा ऑनलाइन भरण्याचा अट्टाहास

125

जिल्ह्यातील अनेक गावात 4 जीचे मोबाईल पोहचले असले, अनेक गावांमध्ये नेटवर्कची सर्वात मोठी समस्या आजही जाणवते. यामुळे ग्राम पंचायतीच्या कामावरही परिणाम होत आहे. नेटवर्कच्या समस्येचा सर्वाधिक फटका हा ग्रामपंचायतयामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला बसत आहे. इथे नेटवर्क समस्या असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे.

गतवर्षापासून ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरु 

नेमणूक झालेल्या गावात रेंज नसल्यामुळे अनेक ग्रामसेवकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आराखडे भरण्याचे काम करावे लागत आहेत. येत्या 30 जानेवारीपर्यंत विकास आराखडे भरून देण्याची मुदत आहे. या मुदतीतच काम पूर्ण करावे लागणार आहे. केंद्र व राज्य सरकार तसेच ग्रामपंचायतींना स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतून गावात काय सुविधा व विकास केला जाणारा आहे, याबाबतचा विकास आराखडा तयार करायच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. याबरोबरच कोणत्या योजनांवर किती खर्च करावा या सूचनाही देण्यात आल्या आहेत. योजना राबवत असताना प्रामुख्याने शिक्षण आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन यावर प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. गतवर्षापासून ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे.

(हेही वाचा नथुराम साकारणाऱ्या कोल्हेंचे शरद पवारांकडून समर्थन! म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.