महिलांची बदनामी करणारे आणखी एक अ‍ॅप आले समोर…

231

‘क्लबहाऊस अ‍ॅप’ मध्ये चॅटरूम चालवून महिलांच्या अब्रूचे लक्तरे काढणाऱ्या तिघांना फरिदाबाद आणि कर्नालमधून मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. क्लबहाऊस या चॅटरूममध्ये महिलांच्या अवयवाचे फोटो टाकून त्यावर बोली लावली जात होती, त्याच प्रमाणे महिलांबाबत अश्लील शब्द वापरून त्यांची लक्तरे काढण्यात येत होती.

आकाश सुयाल उर्फ किरा एक्सडी (१९), जैष्णव कक्कड (२२) आणि यशकुमार उर्फ यश पराशर (२२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. आकाश याला कर्नाल आणि इतर दोघांना फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. ‘क्लबहाऊस अ‍ॅप’ माध्यमातून वेगवेगळ्या चॅट रूम मध्ये महिलांविषयी घाणेरडे शब्द वापरून, त्यांचे अंगप्रदर्शनासह महिलांच्या शरीराच्या अवयवांचे फोटो चॅटरूममध्ये टाकून त्याच्यावर बोली लावली जात असल्याची तक्रार एका महिलेने मुंबई सायबर पोलिसांकडे केली होती.

(हेही वाचा : महिलांशी अश्लाघ्य वर्तन करून ‘तो’ करायचा चोरी! )

आयडीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला

पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तपास सुरू केला. काही तांत्रिक तपासात पोलिसांना क्लबहाऊसच्या दोन्ही चॅट रूम मॉडरेटरमध्ये प्रमुख वक्ता असणारे दोन आयडी पोलिसांना मिळाले आहेत. या आयडीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेऊन तिघांना दोन वेगवेगळ्या राज्यातून ताब्यात घेऊन तिघांना ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे. क्लबहाऊस अ‍ॅपच्या माध्यमातून दोन चॅट रूम तयार करण्यात आले होते. या चॅटरूममध्ये अनेक जण होते, मात्र हे तिघे महिलांच्या अवयवावर चर्चा करू करून त्यांचे फोटो टाकून त्याची बोली लावत होते, तसेच महिलाबाबत अश्लील भाषेचा वापर करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.