यंदाच्या आठवड्यापासून अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांत धडकसत्र सुरु केले आहे. नियमबाह्य अन्न पदार्थ तसेच औषधे बनवणा-यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने यंदाच्या आठवड्यात चार कारवाया केल्यात त्यापैकी भेसळयुक्त पनीर, बंदी घातलेला पानमसाला तसेच दिशाभूल करणारी आयुर्वेदिक औषधांतून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ४३ लाख ८१ हजारांचा माल जप्त केला आहे. राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या विविध शाखांमधून या कारवाया झाल्या आहेत.
आठवड्यातील पहिली कारवाई
१८ जानेवारी रोजी मंगळवारी सोलापूर येथील पेट्रोलपंपावर थांबलेल्या वाहनावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी छापा टाकला. या चारचाकी मोठ्या वाहनावर टाकलेल्या झडतीत तब्बल १०२ पोत्यांमध्ये राजनिवास पानमसाला ठेवला होता. राज्यात या पानमसाल्याच्या विक्रीला बंदी असल्याने तब्बल ४२ लाख ५० हजारांचा माल जप्त करण्यात आला तसेच १० लाखांचे वाहनही जप्त करण्यात आले.
(हेही वाचा यापुढे भाजपचा धांगडधिंगाणा सहन करणार नाही! यशवंत जाधवांनी दिला भाजपला गर्भित इशारा)
दुसरी कारवाई
१९ जानेवारी बुधवारी भिवंडीतील आर्या डेअरी कॉर्पोरेशनवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. या ठिकाणी पनीर उत्पादनासाठी खाद्यतेलाचा वापर केला जायचा. ही नियमबाह्य पद्धत असल्याचा ठपका ठेवत तब्बल ६५० किलोचा १ लाख १५ हजार २०० रुपयांचा माल अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. तसेच तपासणीसाठी पनीर, खाद्यतेल तसेच असेटीक असिडचे काही नमुने घेतले.
तिसरी कारवाई
कोणत्याही आयुर्वेदिक तसेच होमिओपथीच्या औषधावर संबंधित औषध एखाद्या आजारातून बरे करते, असा संदेश छापण्यास अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. नागपूर व वर्धा मार्गावरील हॉटेल रॉयल फूडमध्ये गाझियाबाद येथील मानस हेल्थकेअरकडून मागवलेले शरीरावरील दुखण्यावर मसाजसाठी तेल, मधुमेहाच्या काळजीसाठी चूर्ण, पाचक मेथी ही १५ हजार ८०० रुपयांची तीन उत्पादने जप्त करण्यात आली.
Join Our WhatsApp Community