शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती रविवारी २३ जानेवारी रोजी होत असून याकरता बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांसह चाहते मोठ्याप्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील (शिवाजी पार्क) बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आशिर्वाद द्यायला येत असतात. त्यामुळे हे स्मृती स्थळ विविध रंगीबेरंगी फुलझाडांनी सजवण्यात आले आहे. बाळाहेबांनी आपल्या अंगावर भगवी शाल ओढून घ्यावी त्याप्रमाणे स्मृतीस्थळावरील विविध आकर्षक रंगांच्या फुलझाडांसह भगव्या गोंड्यांनी शाल पांघरलेली गेली अशाप्रकारची सजावट याठिकाणी महापालिकेच्या उद्यान विभाग व जी उत्तर विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
स्मृतीस्थळाची रंगरंगोटीसह विविध फुलांनी सजावट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला असून त्यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. तेव्हापासून शिवसेनेच्यावतीने त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. या दोन्ही दिवशी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे या जयंतीदिनी मोठ्याप्रमाणात शिवसैनिक तसेच बाळासाहेबांचे चाहते दर्शनासाठी येणार असल्याने महापालिकेच्यावतीने स्मृतीस्थळाची रंगरंगोटीसह विविध फुलांनी सजावट करण्यात येत आहे.
शनिवारी युध्दपातळीवर काम पूर्ण
स्मृतीस्थळावरील जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी पुण्यामधून सुशोभित झाडांची रोपे मागवण्यात आली आहे. यामध्ये रेड पॉईंटसेटीया, यलो पॉईँटसेटीया, जलबेरा, क्रिझम थेमन, सफेद शेवंती तसेच भगवा गोंडा आदी फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी २५० फुलझाडांची रोपटी ही रेड पॉईंटसेटीया आणि २०० यलो पॉईँटसेटीयाची आहेत तर ३०० भगवा गोंडा, आदींची रोपटी तसेच ग्रीन लॉन लावून स्मृतीस्थळ सुशोभित केले जात आहे. याशिवाय सिव्हिल कामे, विद्युत कामे, रंगरंगोटी करण्यात येत आहे. महापालिका जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अधिकारी रुपेश पुजारी व त्यांची टिम हे काम करत आहे. हे काम शनिवारी युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे.
(हेही वाचा – देश ऊर्जा निर्मीतीतही आत्मनिर्भर व्हावा, उपराष्ट्रपतींचे आवाहन!)
महापालिका मुख्यालयातही बाळासाहेबांची जयंती होणार साजरी
शिवसेना प्रमुखांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत आल्यानंतर हे दुसरी जयंती आहे. मागील वर्षी ही जयंती शासकीय कार्यालयांमध्ये करण्यास सुरुवात झाल्याने महापालिका मुख्यालयात पहिलली जयंती साजरी करण्यात आली होती, त्यामुळे यंदाही महापालिका मुख्यालयात बाळासाहेबांची जयती साजरी होणार आहे. महापौरांच्या दालनाबाहेर राष्ट्रपुरुषांच्या तसबीर लावून जयंती तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. त्याप्रमाणेच आता बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community