जनसामान्य कोरोना योद्ध्यांच्या अकथित अनुभवांचे संकलन असलेल्या ‘कोविड वॉरियर्स डायरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) राजभवन येथे करण्यात आले.
महामारीतील अप्रकाशित अनुभवांचे कथन
या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदत करणाऱ्या डॉक्टर्स, स्वच्छता कर्मचारी तसेच समाजसेवकांच्या कोरोना काळातील आजवर अप्रकाशित अनुभवांचे कथन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अंथरली झाडा-फुलांची भगवी शाल!)
यावेळी पुस्तकाचे लेखक मिहीर किसन भोईर, तसेच पुस्तकामध्ये उल्लेख असलेले लोकमान्य टिळक रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ सुलेमान मर्चंट, साई लीला फाउंडेशनच्या अध्यक्ष रश्मी उपाध्याय, डॉ चारुता मांडके, हृदयरोग तज्ज्ञ डॉ धीरज कुमार,डॉ शेफाली केशरवानी, डॉ वैभवी माजगावकर, डॉ पूजा पांडे, हेमांग जंगला, शंकर मुन्से आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community