कोरोना रुग्णसंख्या देशात झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. पण, मुंबई शहरात जिथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होती, तिथे आता मात्र मागच्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून पाच हजारांवर स्थिरावलेल्या कोविड रुग्ण संख्येत कमालीची घट झाल्याचे, दिसून येत आहे. शनिवारी ही संख्या चक्क साडेतीन हजारावर आल्याचे पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देणारी ही घटना आहे.
कोरोना रुग्णसंख्येत घट
मुंबईत शुक्रवारी जिथे ५ हजार ८ रुग्ण सापडले होते. तिथे शनिवारी ३ हजार ५६८ रुग्ण सापडले. मागील आठ दिवसात पुन्हा ही घट झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईत शनिवारी २३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजार ४९६ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४९ हजार ९८५ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या.
( हेही वाचा: काही क्षणांसाठी मुंबई झाली ओली चिंब! )
मागील आठवड्यातील रुग्ण संख्या
शनिवारी: ३,५६८
शुक्रवारी: ५,००८,
गुरुवारी: ५,७०८,
बुधवारी: ६,०३२,
मंगळवारी: ६, १४९,
सोमवारी: ५, ९५६,
रविवारी: ७, ८९५,