अरे बापरे…अवघ्या 5 दिवसांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू आणि आई…

130

भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. देशात तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे अवघ्या पाच दिवसांचा बाळाने आपला जीव गमावला आहे. ग्वाल्हेरमध्ये कोरोनामुळे अवघ्या 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

2 दिवस बाळावर उपचार सुरू होते

मुलीच्या जन्मानंतर आई आणि बाळाची कोरोना चाचणी करण्यात आली. मुलीच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर ती आजारी असल्याने तिला ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. येथे 2 दिवसांच्या बाळावर उपचार सुरू होते. यानंतर बाळाचा मृत्यू झाला. बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्यामुळे आरोग्य विभाग हैराण झाले. आरोग्य विभागाकडून कुटुंबातील अन्य सदस्यांच्या टेस्ट केल्या जात आहे. याशिवाय ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिव्हील सर्जन, स्त्री विभागातील एचओडीसह 12 हून अधिक डॉक्टर आणि नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. ओडिशामध्ये तब्बल 927 मुलांना, तर भोपाळमध्ये 170 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ओडिशामध्ये शनिवारी संसर्गाची 8,845 नवीन प्रकरणे आढळल्यानंतर, येथील एकूण संक्रमित लोकांची संख्या 11,96,140 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये 927 मुले देखील आहेत. 170 मुले कोरोना पॉझिटिव्हमध्ये प्रदेशात गेल्या 24 तासांत 11,274 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत. काल हा आकडा 9,385 होता. भोपाळच्या नवीन प्रकरणांमध्ये, एका दिवसात 170 मुले पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्य सरकार देखील सतर्क झाले आहे. रुग्णालयात बालरोग वैद्यकीय सेवा वाढविण्यात येत आहेत. मध्य प्रदेशमध्ये संसर्ग दर 12% पर्यंत वाढला आहे.

(हेही वाचा राज्यात एकाच दिवशी 416 ओमायक्राॅन रुग्ण, मुंबईने पुण्याला टाकले मागे!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.