“तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा” असा नारा देत भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारे स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती आहे. नेताजी सुभाष बाबूंनी स्वतंत्र “आझाद हिंद सेना” स्थापन केली. आझाद हिंद सेनेचे सर सेनापती म्हणून सुभाषचंद्र बोस यांना भारतीय जनता प्रेमाने व आदराने ‘नेताजी’ म्हणू लागली. २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला त्यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा अभिमान आहे.
( हेही वाचा : लसीकरणाची सक्ती म्हणून ‘भारत बंद’! )
पंतप्रधानांनी केले ट्विट
“पराक्रम दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. असे ट्विट करत पंतप्रधान पुढे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. प्रत्येक भारतीयाला त्यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा अभिमान आहे.
सभी देशवासियों को पराक्रम दिवस की ढेरों शुभकामनाएं।
नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती पर उन्हें मेरी आदरपूर्ण श्रद्धांजलि।
I bow to Netaji Subhas Chandra Bose on his Jayanti. Every Indian is proud of his monumental contribution to our nation. pic.twitter.com/Ska0u301Nv
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2022
‘पराक्रम दिवस’
भारताच्या स्वातंत्र्यातील नेताजींचे अतुलनीय योगदान अविस्मरणीय राहावे म्हणून त्यांची जयंती देशभरात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्याचे अभिनव कार्य पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. यातून पुढच्या पिढ्यांमध्ये नेताजींच्या गतिमान विचार आणि आदर्श कायम राहतीय असे ट्विट करत गृहमंत्री अमित शहा यांनी नेताजींना नमन केले आहे. तर, महाराष्ट्र विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तुम मुझे खून दो, मैं तुम आज़ादी दूँगा! एक महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! असे, ट्विट करत नेताजींना अभिवादन केले आहे.
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा!
Humble tributes to one of the greatest Freedom Fighters, Netaji Subhash Chandra Bose, on His 125th birth anniversary !#ParakramDivas #SubhashChandraBose #AzadHindFauj pic.twitter.com/VZc2zis5ga— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2022
प्रधानमंत्री @narendramodi जी ने भारत की स्वतंत्रता में नेताजी के अतुलनीय योगदान को चिरस्मरणीय बनाए रखने हेतु उनकी जयंती को देशभर में ‘पराक्रम दिवस’ के रूप में मनाने का अभिनव कार्य किया है।
यह आने वाली पीढ़ियों में नेताजी के ओजस्वी विचारों व आदर्शों को सींचने का काम करेगा।
— Amit Shah (@AmitShah) January 23, 2022
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जानेवारी रोजी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि म्हटले की ते एक उत्कृष्ट नेते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. “मी श्री बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो. नेहमीच लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला एक उत्कृष्ट नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.” असे ट्विट करत पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
Join Our WhatsApp CommunityI pay homage to Shri Balasaheb Thackeray on his Jayanti. He will be remembered forever as an outstanding leader who always stood with the people.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2022