बाळासाहेब असते तर, मोदी, शहांवर…! काय म्हणाले संजय राऊत?

144

राजकारणातील मॉडल्स संपल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रे काढणे थांबवले होते. त्यानंतर सोनिया गांधी, नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे राजकीय पटलावर आले. त्यावेळी व्यंगचित्रासाठीची ही मॉडेल्स मी मिस केली असे बाळासाहेब म्हणायचे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अमित शहा आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत…बाळासाहेब असते तर यांच्यावर त्यांनी हातात कुंचला घेऊन नक्कीच फटकारे लगावले असते, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांद्या जयंतीनिमित्ताने त्यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एकेकाळी मी कुंचला हाती घेतला की अनेकजण थरथरायचे. आज माझे हात थरथर थरत आहेत. प्रेरणा देणारे मॉडल्स मला आता दिसत नाहीत, असे बाळासाहेब म्हणायचे. चर्चिल, नेहरू, जॉर्ज फर्नांडिस, सरदार पटेल, इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, मोरारजी देसाई, एसके पाटील ही सर्व मोठी माणसे देशाच्या राजकारणात होती. व्यंगचित्रे काढताना ही बाळासाहेबांची मॉडेल्स होती. ही लोकं गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. त्यामुळे बाळासाहेबांना चित्रे काढायला त्यांच्याकडे मॉडल्स नव्हती. पण अचानक राजकारणात सोनिया गांधी आल्या, नरसिंह राव आले, सीताराम केसरी आले तेव्हा ते म्हणाले, अरे रे मी ही मॉडल्स मिस केली. मी व्यंगचित्रं सोडली आणि माझी मॉडल्स परत आली. आजही मोदी आहेत, अमित शहा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत…आता राज्यात आणि देशात गडबड सुरू आहे, बाळासाहेब असते तर त्यांना कुंचला हातात घेऊन स्ट्रोक्स… फटकारे नक्कीच मारावेसे वाटले असते, असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा निवडणूक प्रचार सभांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी कायम)

मी बिघडू नये, म्हणून…

आपल्या आयुष्यावर बाळासाहेबांचा फार मोठा प्रभाव आहे. ते नसते तर मी नसतो. त्यांनी माझ्या सारख्या मातीच्या गोळ्याला घडवून आकार दिला. सामनाचा संपादक, शिवसेनेचा नेता म्हणून मला फार तरुण वयात जबाबदारी दिली, शिवसेनेच्या नेतृत्व मंडळात घेतलं. मी 28 वर्षाचा असतानाच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी माझी निवड केली. त्यांनी मला राज्यसभेत पाठवलं होतं. सतत त्यांनी मला घडवण्याचा प्रयत्न केला. मी बिघडू नये यासाठी त्यांचा हंटर सतत माझ्या अवतीभोवती फिरत होता. ते मनाने खूप मोठे होते. विचारानेही महान होते. सामान्यातील सामान्य माणसाला शूरवीर करण्याची ताकद त्यांच्या सहवासात होती. कितीही खचलेला माणूस असो त्यांच्या सहवासात राहून शूरवीर होत असायचा, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.