देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले असून, संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. केंद्र सरकार ‘आझादी का अमृत महोत्सव’ वर्षभर साजरा करणार आहे, त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याअंतर्गत, राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधत ‘उमंग रांगोळी उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत देशव्यापी उपक्रम
‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाचा भाग म्हणून, संस्कृती मंत्रालय सोमवार २४ जानेवारी रोजी ‘उमंग रांगोळी उत्सव’ आयोजित करत आहे. २४ जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षी हा ‘राष्ट्रीय बालिका उत्सव’ दिवस साजरा करण्यासाठी, आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत हा देशव्यापी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
( हेही वाचा : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती ‘या’ दिग्गजांनी केले अभिवादन! )
एक किलोमीटर लांबीची रांगोळी
या कार्यक्रमातील सहभागी संघ, महिला स्वातंत्र्यसैनिकांचे किंवा देशातील आदर्श महिलेचे नाव दिलेल्या मार्गावर आणि चौकांवर सुमारे एक किलोमीटर लांबीची रांगोळी काढून सजावट करतील. देशभरात ५० हून अधिक ठिकाणी अशाप्रकारची रांगोळी काढली जाणार आहे. ‘बालिका दिन’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ अशाप्रकारे हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp CommunityAs part of #AzadiKaAmritMahotsav, @MinOfCultureGoI will host Rangoli Utsav 'Umang' on National Girl Child Day, January 24th.
More than 50 distinct spots around the country will be decorated with rangoli by participating teams.#NetajiSubhashChandraBose— DD News (@DDNewslive) January 23, 2022