गेल्या दीड-दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. ओमायक्रॉनबाबत दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. कोविड-19 वर रविवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनीही ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत मोठं विधान केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत धोकादायक आहे. हा व्हेरियंट वेगाने पसरणारा जरी असला तरी तो गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले.
ओमायक्रॉन प्रत्येकाला होणार का?
ओमायक्रॉनचा संसर्ग इतर कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अधिक वेगानं होतो. त्यामुळे सर्वांनाच याची लागण होणं, यामध्ये नवं काहीही नाही. या व्हेरियंटची अगदी सहज सर्वांना लागण होऊ शकते. जगभरातील प्रत्येकालाच ओमायक्रॉनची लागण होईल. पुढे म्हणाल्या की, आपण निश्चितपणे जगभरात ओमायक्रॉनचा हाहाकार पाहतोय आणि रुग्णसंख्येतही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहत आहोत, परंतु यामुळे जगातील सर्व लोकांना संसर्ग होईलच असं नाही, असेही मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा –कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांची आत्महत्या? काय आहे कारण?)
या लोकांसाठी ओमायक्रॉन धोकादायक
जगभरात ओमायक्रॉनवर होणाऱ्या संशोधनातून आणि निरीक्षणातून निष्पन्न होत आहे की, ओमायक्रॉन रोग प्रतिकारशक्ती कमी करू शकतो. नव्या व्हेरियंटवर होणाऱ्या संशोधनावरुन, ओमायक्रॉन व्हेरियंट संसर्ग गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी किंवा लसीकरण न केलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरु शकतो, असेही डॉ. केरखोव्ह यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community