….म्हणून मुंबईकरांना वाटतंय आपल्या मालकीचं घर असावं!

114

मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगाला एक वेगळच आयुष्य जगण्यास भाग पाडलं. कधीही न थांबणारी शहरं थांबली, लाॅकडाऊनसारख्या गोष्टी पहिल्यांदाच अनुभवल्या. अशा अनेक गोष्टी कोरोनाने शिकवल्या सोबतच आपलं भविष्य सुरक्षित असायला हवं, तसेच आपली नोकरी सुरक्षित असावी आणि आपल्या मालकीचं घर असावं. असे सगळे धडे कोरोनानेच आपल्याला दिले आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कोरोनानंतर नागरिकांचा कल घर खरेदीकडे कल वाढलेला दिसत आहे.

मालकीचं घर असावं 

भविष्य सुरक्षित करण्यासाठी नागरिकांना आपले स्वत: चे घर असावे असे वाटू लागले आहे. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणारे 77 टक्के मुंबईकर आता स्वत:च्या मालकीच्या घरात राहायला जाण्याचा विचार करत असल्याचे, गोदरेज हाऊसिंग फायनान्सने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

( हेही वाचा :कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांची आत्महत्या? काय आहे कारण? )

…म्हणून स्वत: चे घर असावे 

गेल्या वर्षभरात 56 टक्के मुंबईकरांनी नवीन घराचा आणि गृहकर्ज पुरवठादाराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. हे प्रमाण अहमदाबादमध्ये देशात सर्वात जास्त म्हणजे 64 टक्के आहे. सध्या नवीन घर खरेदी हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे, मुंबईतील 28 टक्के नागरिकांचे मत आहे. आपला नोकरी- धंदा सुरक्षित असावा, हा मुद्दा 38 टक्के मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरला, तर 27 टक्के मुंबईकरांनी स्वत: चे भविष्य सुरक्षित करण्यासाठी नवे घर खरेदी करणे महत्त्वाचे असल्याचे, सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.