चंद्रपुरात नवजात बाळाला विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली असून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत ८ तासात सदर गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दरम्यान याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
असा घडला प्रकार
१३ जानेवारी २०२२ च्या रात्री चंद्रपूरच्या शासकीय रूग्णालयात पिडीत महिलेने एका बाळाला जन्म दिला. ही महीला रुग्णालयात दाखल असताना तिच्या घराशेजारी राहणारी मिना राजू चौधरी ही महिला तिला भेटायला वारंवार यायची. दोन दिवसांनी त्या मातेची रुग्णालयातून सुटी झाल्याने शेजारीच राहणाऱ्या मिना चौधरी हिने पीडितेला स्वतः बरोबर नेले. पिडीतेला थेट घरी न नेता सरळ मिना हिने पिडीतेला लोहारा येथील लोटस या हॉटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी बतावणी करून सांगण्यात आले की, पिडीतेला एच. आय. व्हि. असून जर बाळाला जवळ ठेवले तर बाळाला सुध्दा एच. आय. व्हि होऊ शकतो, असे सांगून बाळाला सुरक्षित ठेवायचे असल्यास नागपूर येथील मुलांचा सांभाळ करणारे आपल्या ओळखीच्या एन.जी.ओ.कडे काही काळ सांभाळायला देण्यास सांगितले. ते सोबतच आले आहेत. एड्सच्या भीतीने पीडित मातेने आपले बाळ नागपूर येथून आलेल्या ३ महिलांच्या स्वाधिन केले.
(हेही वाचा – ‘एनएमएमटी’मध्ये चालतं-फिरतं ग्रंथालय, आता वाचा आवडतं पुस्तक कुठेही…)
बाळाला भेटण्याचा तगादा
१८ जानेवारी रोजी मीना चौधरी ही पिडीत हिच्या घरी जाऊन तिला बाळ सांभाळण्याचे म्हणून ४९ हजार रुपये दिले. मात्र आपले बाळ सांभाळण्याचे आपल्यालाच पैसे कसे मिळतील अशी शंका पिडीतेला आल्याने तिने बाळाला भेटायचे नवजात आहे असा तगादा लावला. मात्र मिना चौधरी हिने उडवा-उडवीचे उत्तर देत असल्याने आपल्या बाळाला विकण्यात आल्याची शंका आल्याने पीडितेने अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी संपूर्ण घटना समजुन घेतली. त्यावरून रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
बाळ २ लाख ७५ हजाराला विकल्याचे कबुल
घटनेची माहिती घेतली असता यातील प्रमुख आरोपी नामे मिना चौधरी हिला ताब्यात घेण्यात आले. तिला विचारपूस केली असता तिने तिचा बल्लारपूर येथील प्रियकर जाबिर रफिक शेख (३२) व त्याचा चंद्रपुरातील मित्र अर्जुग सलीम सय्यद (४३) याचे मदतीने नागपूर येथील वनिता कावडे, पुजा शाहु, शालीनी गोपाल मोडक यांना सदर नवजात बाळ २ लाख ७५ हजार रुपये किमतीला विकल्याचे कबुल केले. त्यावरून तात्काळ कोणताही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप कापडे यांचे सह एक पथक नागपूर करीता रवाना करण्यात आले. त्यांनी तिन्ही महिलांबद्दल माहीती घेतली असता दोन महीला रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून त्यांना नागपूर येथून ताब्यात घेतले व १० दिवसाचे बाळा बाबत विचारणा केली असता त्यांनी सदर बाळ हे चंद्रपूर येथे दिल्याचे धक्कादायक माहिती प्राप्त झाली. त्यावरून सदर आरोपींना चंद्रपूर येथे आणून मिळालेल्या माहितीनुसार स्मिता मानकर या महीलेकडे सांभाळायला ठेवलेल्या बाळाला ताब्यात घेतले.
Join Our WhatsApp Community