बाळासाहेबांनी सेनेला युतीत सडवले का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

133

‘भाजपासोबत युतीत 25 वर्षे सडलो’ असं बोलत आहात, तर तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयावर बोट ठेवत आहात का? बाळासाहेब 2012 पर्यंत युतीचे नेते होते. त्यांच्या हयातीत त्यांनी युती कायम ठेवली. त्यामुळे तुम्ही त्यांच्या निर्णयावर बोट ठेवत आहात का, बाळासाहेबांनी सेनेला युतीत सडवले का?, असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना आम्ही युतीत सडलो, असा पुनरुच्चार केला. यावर उत्तर देताना फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.

तुमच्या पक्षाच्या जन्माआधी भाजपचा नगरसेवक होता…

भाजपसोबत युतीत सडलो असं म्हणणा-यांनी हे समजून घ्यावं की, भाजपसोबत असताना ते पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर, चौथ्या क्रमांकावर गेले याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले, त्याचं शल्य ते बोलून दाखवत आहेत, असं सागंतानाच तेच तेच मुद्दे त्यांच्या भाषणात असतात. कदाचित, शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं असेल, असा चिमटाही फडणवीसांनी घेतला. फडणवीस पुढे म्हणाले की, तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होते. भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणुक शिवसेनेने लढवली. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर लढले होते. भाजपसोबत असताना नंबर एक वर असणारा पक्ष आता नंबर चारवर गेला आहे. म्हणजे लक्षात घ्या कुणाबरोबर कोण सडलं, असं फडणवीस म्हणाले.

तुमचं हिंदुत्व हे भाषणातल्या कागदावर आहे

फडणवीस म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात लाठ्या काठ्या खाणारे आम्ही होतो, तुम्ही तोंडाच्या वाफा घालवल्या. राम मंदिर मोदींनी करून दाखवलं. तुम्ही दुर्गाडीचा प्रश्न तरी सोडवा. तुमचं हिंदुत्व हे भाषणातलं कागदावरचं आहे. औरंगाबाद, उस्मानाबादचं नाव बदललं नाही, प्रयागराज नाव बदलून दाखवलं असं ते म्हणाले. ते म्हणाले की, काल आम्ही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ट्वीट केलं, पण गांधी कुटुंबियांनी हे ट्वीट केलं का? याला लाचारी म्हणतात, असं फडणवीस म्हणाले.

( हेही वाचा: बापरे! थंडी आणि धुक्यामुळे ‘या’ ४८१ रेल्वे गाड्या रद्द )

तेव्हाही जनतेनं तुम्हाला नाकारलं

त्यांनी पुढं म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणांमध्ये राज्याचं हित काही नाही. त्यांच्याकडे बोलायला काही नाही. भारतीय जनता पार्टी आपलं सरकार बनवेल, आम्ही अजुनही एक नंबर आहेत, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, ते असं म्हणतायेत की, बाबरीनंतर शिवसेनेची लाट होती. त्यावेळी उत्तर प्रदेशात शिवसेनेचे 180 उमेदवार लढले होते, त्यापैकी 179 उमेदवारांचं डिपॅाझिट जप्त झालं होतं. तुम्हाला जनतेनं तेव्हाही नाकारलं होतं. कारण राम मंदिराच्या आंदोलनात कारसेवक होते, असं ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.