‘या’ जिल्ह्यात होणार १०० टक्के मालमत्ता कर वसुली?

99

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच १०० टक्के मालमत्ता कर वसुली करण्याच्या दृष्टीने कडक नियोजन करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहायक आयुक्त व कर निरीक्षक यांना दिले. दरम्यान, प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कर आकारणी न झालेल्या नवीन मालमत्तांचा शोध घेऊन तात्काळ एका आठवड्यात कर आकारणी करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले.

ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश

आज अखेर अंदाजे ४८०.५० कोटी रुपये मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. सदरची वसुली ही निर्धारित इष्टांकाच्या ६५ टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास १० लाख ८७ हजार ४० मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या एकूण १७६ ब्लॉकमधील सर्वच नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिका-यांना दिल्या आहेत. यासोबतच प्रभाग समितीनिहाय कर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त व कर निरीक्षक यांना दिले.

( हेही वाचा : महाराष्ट्राच्या ‘या’ चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड )

नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम

प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कर आकारणी न झालेल्या नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन तात्काळ एका आठवड्यात कर आकारणी करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले. त्याचप्रमाणे ब्लॉकनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देतानाच पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.