आता कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कृत्रिम ऑक्सिजन साठा तयार ठेवा, अशी सूचना आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाना केली आहे. सोमवारी राज्याच्या कोरोनाच्या आकडेवारीने 2 लाख 99 हजार 609 पर्यंत मजल मारली.
आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची भीती
त्यामुळे वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आता कृत्रिम ऑक्सिजन साठा तयार ठेवायला हवा अशा हालचाली सुरु करा अशी माहिती आरोग्यविभागाकडून मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोना रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासानाच्या त्रासाचे प्रमाण कितपत आहे याची सतत पाहणी करत रहा अशी सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी संबंधित यंत्रणांना दिली आहे. अन्यथा आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
(हेही वाचा -येत्या गुरुवार, शुक्रवारी मुंबईत ‘या’ भागात पाणीपुरवठा १८ तास राहणार बंद)
सोमवारच्या नोंदी
सोमवारी राज्यात 28 हजार 286 नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे आता सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाख 99 हजारवर 609 पर्यंत पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी केवळ 21 हजार 941 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला.
सोमवारी 36 कोरोनाच्या रुग्णांनी उपचारादरम्यान आपला जीव गमावला.