आता पोलीसच तुमच्या दारी! कसे ते वाचा

126

आधी कोणताही करार झाल्यानंतर त्याची प्रत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देणे बंधनकारक होते , पण आता मात्र पोलीसच एका साईटच्या माध्यमातून तुमच्या दारी आले आहेत. भाडेकरार झाल्यानंतर, तो पोलीस ठाण्यांना देऊन तेथे पुन्हा भाडेकरु व घरमालकाची नोंदणी करण्याचा उलटा प्रवास आता थांबणार आहे. घरमालक व भाडेकरु यांच्यात मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयाकडे झालेल्या अधिकृत नोंदणी भाडेकरार झाल्यानंतर, ते पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन पोलिसांकडे देणे बंधनकारक नाही. याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस विभागांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे घरमालक, भाडेकरुंसह पोलिसांचे वेळ व कष्ट वाचणार आहेत.

पोलीस ठाण्यात नोंदणी करावी लागते

शहरातील भाडेतत्वावर घरे देणा-या घरमालकांकडून भाडेकरुंसमवेत ऑनलाइन भाडेकरार केला जातो. या भाडेकरारासाठी भाडेकरु व घरमालक यांची संपूर्ण माहिती, सध्याचा व मूळ पत्ता, फोटो व अंगुली मुद्रासह भाडेकरार ऑनलाइन उपलब्ध होतो. या भाडेकरारासाठी भाडेकरु व घरमालक यांची संपूर्ण माहिती, सध्याचा व मूळ पत्ता, फोटो व अंगुलीमुद्रासह भाडेकरार ऑनलाइन उपलब्ध होतो. असा भाडेकरार झाल्यानंतरही तो जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन त्याची नोंदणी करावी लागते.

( हेही वाचा: गांजा लपवण्यासाठी बनवली खास कार, पोलिसांनी असा लावला छडा! )

कामात सुसूत्रता येण्यासाठी घेतला निर्णय

हा ताण कमी व्हावा, त्यामध्ये सुसूत्रता यावी, यासाठी ऑनलाइन भाडेकरारालाच पोलीस पडताळणी जोडून महसूल विभागाकडे नोंद झालेला भाडेकरार थेट पोलिसांच्या सीसीटीएनएस प्रणालीला उपलब्ध व्हावा, यासाठी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट या संघटनेचे अध्यक्ष सचिन सिंघवी, मंगेश पाटील, योगेश पंपालीया, इस्माईल नदाफ, हनुमंत नेटके यांनी मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक, पोलीस आयुक्त व पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती. संबंधित मागणीची दखल घेण्यात आली आहे. या समस्येची पोलीस महासंचालक कार्यालयानेही दखल घेतली. त्यानुसार, 30नोव्हेंबर 2021 पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. सुहास वारके यांनी याबाबत परिपत्रक काढून सर्व पोलीस घटकांना पाठविलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.