मुंबईत बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करणे, तिकिट काढणे, पास काढणे चलो अॅपमुळे अगदीच सोयीस्कर झाले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बेस्टचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी चलो अॅपचे अनावरण केले व हे अॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले. या अॅपमुळे प्रवाशांना अनेक नवनवीन सुविधांचा लाभ घेता येणार आहे. याअंतर्गत आता बेस्टने सुपर सेव्हर योजना लॉंच केल्या आहेत. चलो अॅपचा वापर केल्यामुळे आता पैशांचीही बचत होणार आहे.
या अॅपमुळे आता डेपोमध्ये लाईन लावून तिकिट काढण्याची आवश्यकता भासणार नाही. चलो सुपर सेव्हर योजना तुम्हाला तुमच्या बस प्रवासावर पैसे वाचविण्यास मदत करतात. सुपर सेव्हर योजना चलो कार्ड आणि चलो अॅपवर उपलब्ध आहेत. तुमच्या सोबत तुम्ही हे स्मार्ट कार्ड कायम बाळगू शकता. यात वेळोवेळी पैसे भरून रिचार्ज करणे गरजेचे आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास होणार ‘BEST’! )
बेस्ट सुपर सेव्हर योजना!
-सुपर सेव्हर योजना
प्रवाशांनी दैनंदिन तिकिट किती रुपये असते त्या पर्यायाची निवड करावी, त्यानुसार सुपर सेव्हर प्लॅन उपलब्ध होतील
उदाहरणार्थ,
५ रुपये तिकिट- ५० सहली (महिना) १९९ रुपये
१० रुपये तिकिट- ५० सहली (महिना) ३९९ रुपये
१५ रुपये तिकिट- १०० सहली(महिना) ७४९ रुपये
– मोबाईल तिकिट
प्रत्येक बस ट्रिपवर १ ते २ रुपये कमी
– ज्येष्ठ नागरिक योजना
५ रुपये तिकिट- १०० सहली (महिना) १९९ रुपये
( हेही वाचा : येत्या गुरुवार, शुक्रवारी मुंबईत ‘या’ भागात पाणीपुरवठा १८ तास राहणार बंद! )
-अनलिमिटेड पास
दैनंदिन पास – ५० रुपये
दैनंदिन पास (AC) – ६० रुपये
महिना पास – १ हजार रुपये
– विद्यार्थी पास
महिना पास – २०० रुपये
त्रैमासिक पास – ६०० रुपये
– स्पेशल पास
रिपोर्टर/ पत्रकार – ३९५ रुपये
दिव्यांग व्यक्ती – ३ वर्षे मोफत प्रवास
शासकिय सेवानिवृत्त व्यक्ती- ९०० रुपये