गेल्या दोन पासून कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पसरले आहे. त्यामुळे विवाह विधीमध्ये खूप अडचणी येत आहे. सध्या कोरोना थैमान घालताना दिसत असला तरी बाधितांच्या संख्येत घट होताना दिसतेय. अशातच अनेक जण विवाह इच्छूक यंदा आपले कर्तव्य पार पाडू इच्छित आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता येताच अनेकांना लगीन घाई सुरू केली आहे. विशेषतः मुहूर्त लागून आल्याने मुंबईसारख्या शहरांसह ग्रामीण भागातही लग्नाता बार मोठ्या प्रमाणात उडवून दिला जात आहे. यंदाच्या नवीन वर्षात १२ महिन्यांपैकी ९ महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या कोणत्या महिन्यात किती आहेत मुहूर्त…
कोणत्या महिन्यात किती मुहूर्त
- फेब्रुवारी – ५, ६, ७, १०, १७, १९
- मार्च – २५, २६, २७, २८
- एप्रिल – १५, १७, १९, २१, २४, २५
- मे – ४, १०, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७
- जून – १, ६, ८, ११, १३, १४, १६, १८
- जुलै – ३, ५, ६, ७, ८ ,९
- नोव्हेंबर – २४, २७, २८, २९
- डिसेंबर – २, ४, ८ ९, १४, १६, १७, १८
(हेही वाचा – स्वस्त मस्त BEST! ‘या’ सुपर सेव्हर योजना करणार प्रवाशांची बचत!)
पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी असे सांगितले की, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात कोणताही लग्नाचा मुहूर्त नाही. त्यामुळे विवाहेच्छुकांना विवाह मुहूर्तासाठी अडचण येणार आहे. गेल्या २ वर्षांपासून चातुर्मासातही काढीव मुहूर्त देत असतो. तसे यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काढीव गौण मुहूर्त दिले आहेत.
Join Our WhatsApp Community