भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या भोवती नवा वाद निर्माण झाला आहे. सोमय्या यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो मंत्रालयातील आहे. ज्याने सोमय्या अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या हे मंत्रालयातील नगरविकास विभागात एका केबिनमध्ये फाईल तपासत होते, अशा फोटोमुळे सोमय्या यांना बसायला खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आता समोर येत आहे.
सोमय्या काय म्हणाले?
यावर आता महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांनी विरोध केला आहे. यावर किरीट सोमय्या म्हणाले, मंत्रालयात किरीट सोमय्या नेमक्या कोणाच्या फाईल बघत होते? उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर की अशोक चव्हाण? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ठाकरे सरकारने या प्रकरणी हवी ती चौकशी करावी, एसआयटी नेमावी, आम्ही कोणाला घाबरत नाही. घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे सोमय्या म्हणाले.
(हेही वाचा सेनेकडून टिपूचे पुन्हा उद्दात्तीकरण! प्रजासत्ताकदिनी धर्मांधतेला प्रोत्साहन)
काय म्हणतात घटक पक्ष?
काँग्रेस नेते सचिन सावंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सोमय्यांवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की, भाजप नेत्यांची मानसिक स्थिती हलाखीची झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी आहे. किरिट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सावंत यांनी म्हटले. सोमय्या यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community