आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसून निवडणूक कधी जाहीर होणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेने २३६ प्रभागाचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेला आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग पुढील प्रक्रिया जाहीर करेल. परंतु मुंबई महापालिकेची नवीन महापालिका ९ मार्चला स्थापन होणे आवश्यक आहे. पण याला होणारा विलंब लक्षात घेता आणि निवडणूक लांबणीवर पडल्यास त्यांना वाढीव कालावधी वाढवून देणे किंवा प्रशासक नेमणे या समस्या टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोग या निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! ‘या’ सुपर सेव्हर योजना करणार प्रवाशांची बचत! )
विद्यमान महापालिकेचा कालावधी संपुष्टात येण्याची शक्यता
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित मानले जात असताना कोविड आणि ओबीसी आरक्षण या सर्व पार्श्वभूमीवर हे निवडणूक लांबणीवर पडेल की काय असे वाटत असतानाच राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील भागांची संख्या २२७ व २३६करण्याचा निर्णय घेतला. या २३६ प्रभागांचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आता २३६ प्रभागांसाठी हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया राबवेल. त्यानंतर प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया जवळ आली तरी ओबीसी आरक्षणाबाबत सध्या तरी कोणतीही स्पष्टता नाही. तरीही एसी, एसटी, महिला आरक्षण हे जाहीर करावे लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे आरक्षण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. जर हे आरक्षण जाहीर केले तर त्याबाबत हरकती व सूचना मागविल्या जाव्या लागणार आहे. दोन्ही प्रक्रियांचा कालावधी लक्षात घेतल्यास मुंबई महापालिका निवडणूक ही विद्यमान महापालिकेचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी अर्थात ८ मार्च पूर्वी निवडणुका घेतल्या जाणार नाही. त्यामुळे विद्यमान महापालिकेचा कालावधी संपुष्टात येण्याची शक्यता असून त्यानंतरच निवडणूक घेतल्या जातील असे चित्र दिसून येत आहे . त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे यापूर्वीचे निर्देश आणि महापालिकेला कोणतीही वाढ न देण्याचा निर्देश तसेच प्रशासक नेमता येत नसल्याची अडचण लक्षात घेता राज्य निवडणूक आयोग ही निवडणूक मार्च ८ पूर्वी अर्थात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल.
( हेही वाचा : सेनेकडून टिपूचे पुन्हा उद्दात्तीकरण! प्रजासत्ताकदिनी धर्मांधतेला प्रोत्साहन )
निवडणूक जाहीर झाल्यास आचारसंहितेचा कालावधी सुरु होतो. त्यामुळे महापालिकेची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यामुळे विद्यमान महापालिकेचा कालावधी संपुष्टात आला तरीही वाढीव कालावधी वाढवून देण्याची गरज भासणार नाही. तसेच शिवाय मुदत संपली म्हणून महापालिकेवर प्रशासक नेमण्याची ही गरज भासणार नाही. आचारसंहितेचा कालावधी सुरु झाल्याने तसेच निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने पुढील सगळ्यात तांत्रिक अडचणींवर मात करता येऊ शकते. निवडणुकीमध्ये ४५ दिवसांचा कालावधी विचारात घेतला जात असला तरी कमीत कमी १८ दिवसांचाही कालावधी आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग कशाप्रकारे या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर करून राबवते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Join Our WhatsApp Community