सिंधुदुर्गमधील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्यासमोर २७ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे राणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी बाजू मांडणार आहेत.
परब हल्ला प्रकरणी राणे यांचा सिंधुदुर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्या आदेशाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयाने देखील राणेंविरोधात निर्णय देत जामीन अर्ज नाकारला. आता त्यावर राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर गुरुवार, २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
(हेही वाचा बापरे…मंत्रालयाचे गेट बनले सुसाईट स्पॉट! शेतकरी, बेकार तरुण आता पोलिस…)
उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन
याआधी राणे यांनी सत्र आणि उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी वकिलांची फौज उभी केली होती. यात अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर आणि उमेश सावंत या वकिलांनी राणेंची बाजू मांडली होती, असे होऊनही राणे यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यामुळे आता मुकूल रोहतगी हे सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे यांच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत.
Join Our WhatsApp Community