राज्यात १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार महाविद्यालये…

147

कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्यात आल्या आणि महाविद्यालये बंदच होते त्यामुळे ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र पुन्हा महाविद्यालये विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

ओमायक्रॉनमुळे हे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व अन्य शैक्षणिक संस्थांमधील वर्ग १ फेब्रुवारीपासून ऑफलाइन सुरू होतील. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विभागाने घेतला होता. कोरोनामुळे सरकारने ७ जानेवारीला आदेश काढून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यातील प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना कमी प्रादुर्भाव असलेल्या भागातील महाविद्यालये सुरू करण्याची मागणी होत होती. विद्यार्थी, पालक आणि लोकांच्या मागणीचा विचार करून राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – नितेश राणेंच्या याचिकेवर सरन्यायाधीशांसमोर सुनावणी! कोण करणार युक्तीवाद? )

दोन डोस घेतल्यास वर्गात प्रवेश

कोरोनाची स्थानिक परिस्थिती पाहून महाविद्यालये सुरू करण्याचे अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत. यासंदर्भातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर विभागाने आदेश काढला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांनाच वर्गात प्रवेश मिळणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात तर त्यानंतरच्या परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.