मागील काही अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू असून बस आगारातून एकही बस आगारातून बाहेर पडत नसल्याने कित्येक बसेस एका जागीच उभ्या आहेत. त्यामुळे अनेक दिवस या बसेस धूळ खात आगारांमध्ये उभ्या असल्याने आता या बसेस पुन्हा रस्त्यावर काढायच्या म्हटल्या तरी मोठा खर्च येणार आहे. या बंद बसेस एसटी महामंडळासाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत.
गर्दी नसल्याने गर्दुल्यांनी उचलला फायदा
आगारात या बसेस एका जागी उभ्या असल्याने आणि बरेच दिवस न चालल्याने बसच्या मेंटेनन्समध्ये वाढ होत चालली आहे. आगारांमधून बसचे पार्ट्स चोरी जाणे व इतर नासधूस असे प्रकार घडू लागल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी आगार बंद असल्याचा व आगारात प्रवाशांची वर्दळ नसल्याचा फायदा घेऊन चोरटे, गर्दुल्ले एसटी आगारांमध्ये एकाच जागी उभ्या असणाऱ्या एसटी बसेसचे काही लोखंडी पार्ट्स चोरी करून नेण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा – एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! आता ‘ही’ माणसं होणार लालपरीचे चालक अन् वाहक)
मेटेनन्स खर्चात होणार वाढ
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी आगारांमध्ये बस एका जागीच उभ्या असल्याने बसच्या बॅटरी डाऊन झाल्या, तर काही बसच्या चाकांमधील हवा कमी झाली. बस पुन्हा रस्त्यावर धावण्यासाठी महामंडळाला एसटी बसेसची अनेक कामे करावी लागणार आहे, त्यामुळे मेटेनन्स खर्चात वाढ होणार हे निश्चित आहे.
Join Our WhatsApp Community