73 व्या प्रजासत्ताक दिनी जनपथावर होणा-या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी जी टोपी घातली होती, सध्या त्या टोपीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दिवंगत सीडीएस बीपिन रावत सुद्धा अशीच टोपी घालत होते. आज मोदींनीही हीच टोपी घातली. देशात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विशेषत: सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही निवडणुका होत आहेत. त्यामुळे मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रावत घालत असलेली टोपी निवडणुका पाहून घातली आहे का? अशी सध्या चर्चा आहे.
म्हणून असा वेश केला
पंतप्रधान मोदी नेहमीच त्यांच्या पोशाखावरुन चर्चेत असतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ते कोणता पोशाख परिधान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोदींनी यावेळी उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचा गमछा घातला होता.त्यांच्या टोपीवर उत्तराखंडचं राज्य फूल ब्रह्मकमळही लावलेलं होतं. काळ्या रंगाची टोपी त्यांनी घातली होती. या दोन्ही राज्यात पुढच्या महिन्यात मतदान होत आहे. त्यामुळे मोदींच्या या वेशभूषेकडे संकेत म्हणून पाहिलं जात आहे.
( हेही वाचा: जवानांनी 15 हजार फुटांवर फडकवला तिरंगा )
निवडणुका लक्षात घेऊन वेश केल्याची चर्चा
बिपीन रावत हे उत्तराखंडमधुन येतात. हा डोंगराळ परिसर आहे. टोपी परिधान करणं ही इथली खासियत आहे. रावतही ही टोपी परिधान करायचे. खासगी कार्यक्रमात रावत नेहमीच या टोपीत दिसायचे. त्यांना श्रद्धांजली म्हणूनच मोदींनी ही टोपी परिधान केल्याचं सांगितलं जात आहे.तसेच, उत्तराखंडमध्ये येत्या 14 फेब्रुवारी रोजी 70 जागांवर मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही टोपी घालून उत्तराखंडच्या नागरिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. उत्तराखंडच्या टोपीसह मोदींनी गळ्यात मणिपुरी गमछाही परिधान केला होता. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. भाजपच्या नेतृत्वातील एन. बीरेन सिंह सरकारची या निवडणुकीत कसोटी लागणार असल्याचे, सांगितले जात असताना मोदींनी मणिपुरी गमछा परिधान केल्याने, त्याकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे.
Join Our WhatsApp Community