अकोला येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शास्त्री क्रीडांगणावर काढण्यात आलेल्या रांगोळीची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अवघ्या बारा तासात नोंद झाली आहे. प्रजासत्ताक दिना निमित्त काढण्यात आलेल्या या रांगोळीचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ही कौतुक केले आहे.
गोल्डन बुकमध्ये रांगोळीची नोंद
शास्त्री स्टेडियम येथील साडेपाच हजार स्केअर फूट जागेत काढण्यात आलेली ही रांगोळी अवघ्या बारा तासात काढण्यात आली आहे. तसेच दोन हजार किलो रांगोळी यासाठी लागली आहे.आझादी का अमृत महोत्सव अशी थीम घेऊन ही रांगोळी काढण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र आणि राष्ट्रध्वजाच्या रंगांमध्ये काढण्यात आलेल्या या आकर्षक रांगोळीला अमृता सेनाड यांच्या पथकाने ही रांगोळी काढली आहे. इतक्या कमी वेळेत रांगोळी काढण्यात आल्याने या रांगोळीची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड घेण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी अंजली इंगळे, निशा गर्जे, श्रावणी देशमुख, सुष्ट्री देशमुख,प्रांजली नायसे, जय जोशी, प्रज्वल सावके, ओम जगताप, वेदांत सातपुते यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community