थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यात कायम असून, पुढील दोन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह आता विदर्भातही येणार असल्याचा इशारा केंद्रीय वेधशाळेने दिला. आज विदर्भातील काही भागांत थंडीचा दिवस आल्याची माहिती केंद्रीय वेधशाळेने दिली.
(हेही वाचा – मुंबईकरांना अतिरिक्त जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे)
सध्या कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील किमान तापमान पाच अंशाखाली नोंदवले जात आहे. बुधवारी जळगावात चक्क ५ अंश सेल्सिअसची नोंंद झाली. राज्यात हिवाळ्याचे आगमन झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात कमी नोंदवलेल्या किमान तापमानाची नोंद जळगावात दिसून आली. नजीकच्या नाशकातही किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. पुण्यात किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअसवर तर चिखलदरा येथे किमान तापमान ८.५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज
तर जालन्यातही किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. उत्तर कोकणातील किमान तापमान पंधरा अंशाच्या आसपास नोंदवले जात असले तरीही उद्या गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १४ अंश सेल्सिअसवर खाली उतरेल, असा अंदाजही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community