तब्बल 69 वर्षांनंतर एअर इंडिया ‘टाटा’ समूहाकडे परतणार…काय आहे कारण?

133

सरकारी विमान कंपनी एअर इंडिया २७ जानेवारीला टाटा समूहाकडे सोपवली जाणार आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या मेलमध्ये, कंपनीने असे म्हटले आहे की एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया 27 जानेवारी 2022 रोजी निश्चित करण्यात आली आहे. 24 जानेवारीला टाटा समूहाला एअर इंडियाची बॅलेन्सशीट देण्यात आला आहे. जेणेकरून टाटा कंपनीला त्याचा आढावा घेणं शक्य होऊ शकेल. त्यामुळे एअर इंडियाचे संचलन टाटा समूह करणार असून लवकरच इतर औपचारिक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

टाटा समुहाचे हे पहिले पाऊल

आज गुरूवारी एयर इंडियाचा ताबा टाटा समुहाकडे देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्याचाच भाग म्हणून टाटा समुहाकडून आजपासून एयरलाईन्समध्ये जेवणाच्या सुविधेला सुरूवात होणार आहे. टाटा समूहाकडून आज एयर इंडियाच्या चार फ्लाईट्ससाठी जेवणाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगानेच टाटा समुहाचे हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे. पण टाटा समुहाच्या बॅनरअंतर्गत या फ्लाईट्स नसतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई न्यूयॉर्क, मुंबई दिल्ली अशा पाच फ्लाईट्समध्ये ही सेवा देण्यात  समोर आलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाने एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेचा एक भाग म्हणून 100 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची सरकारची बोली जिंकली होती. टाटा समूहाने 18000 कोटी रुपयांची बोली जिंकली. 27 जानेवारी रोजी एअरलाइनच्या हस्तांतरणाच्या वेळी, DIPAM, वित्त मंत्रालयाचे अधिकारी तसेच टाटा समूहाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

(हेही वाचा – …म्हणून हिमाचल प्रदेशात तब्बल 417 रस्ते बंद!)

आजपासून टाटा आपली सेवा सुरू करणार 

या करारांतर्गत, सरकार एअर इंडिया एक्सप्रेस आणि ग्राउंड हँडलिंग आर्म एअर इंडिया SATS मधील 50 टक्के हिस्सेदारी टाटा समूहाकडे सुपूर्द करणार आहे. टाटा एअर इंडिया या कराराच्या बदल्यात सरकारला 2,700 कोटी रुपये रोख देणार असून एअरलाइन्सवरील 15,300 कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. केंद्र सरकारने तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. केंद्र सरकारने निविदा प्रक्रियेनंतर 8 ऑक्टोबर 2021 रोजी 18 हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ‘टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून गुरुवारपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे.

एअर इंडिया 69 वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या मालकीची

69 वर्षांपूर्वी एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची होती. नंतर सरकारने ही विमानसेवा ताब्यात घेतली. आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा विमानसेवा टाटा समूहाची होणार आहे. बोली जिंकल्याच्या निमित्ताने टाटा सन्सचे तत्कालीन अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, टाटा समूह या नात्याने एअर इंडिया विजेता झाल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्यासाठी हा ऐतिहासिक प्रसंग आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी एअर इंडियाला जागतिक दर्जाची एअरलाइन बनवण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल. सध्या टाटाच्या दोन विमान कंपन्या आहेत. एअर इंडिया हा तिसरा ब्रँड असेल. या ग्रुपकडे एअरएशिया इंडिया आणि विस्तारामधील बहुतांश भागभांडवल आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.