आपण कुठे चाललो आहोत ? आपण कोणत्या समाजात वावरत आहोत? याचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज भासली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आंध्रप्रदेशातून समोर आली आहे. आपली मुलगी जास्त वेळ फोनवर घालवते, म्हणून तिला अद्दल घडवण्यासाठी नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची, घटना आंध्रप्रदेशातील विजागमध्ये घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
अन् त्याने साधली संधी
इयत्ता 10 वीत शिकणा-या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांकडून बलात्कार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपीच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. त्याच्या पत्नीने त्याला एक किडनी दान केल्याने त्याचे प्राण वाचले होते. फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, काही दिवसांपूर्वी आरोपीची पत्नी आपल्या इयत्ता 10वीत शिकणा-या 15 वर्षांच्या मुलीला घरी ठेवून, आईला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीने जो एक व्यापारी आहे, त्याने आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार केला.
( हेही वाचा: बूस्टर डोस प्रभावी आहे की नाही? तज्ज्ञांच्या मनात शंका! )
आरोपीची कबूली
लैंगिक अत्याचार सहन करु न शकलेल्या मुलीने आपल्या या लैंगिक छळाबाबत शिक्षकांकडे तक्रार केली. शिक्षकांनी तिच्या वडिलांना शाळेत बोलावले आणि विचारणा केली असता, आरोपीने गुन्हा मान्य करुन माफी मागितली. त्यानंतर शाळेतील शिक्षक आणि मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने आपली मुलगी सतत फोनवर असते, त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी असे कृत्य केल्याचे कबूल केले. सध्या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community