१०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीत सुवर्ण संधी! २,७८८ रिक्त…

136

लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी, हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सीमा सुरक्षा दलाने (BSF)  दिलासा दिला आहे.

सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकूण २ हजार ७८८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे. इच्छुक विद्यार्थी bsf.nic.in या वेबसाईटवरून अर्ज दाखल करू शकतात.

  • पदाचे नाव : कॉन्टेबल ( ट्रेड्समॅन)
  • पदसंख्या : 2788 जागा
  • शैक्षणिक पात्रता : दहावी पास
  • वयोमर्यादा : 18 ते 23 वर्ष
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी २०२२

( हेही वाचा : कचरा कुंडी बनलेले ‘ते’ पुरातन प्याऊ पुन्हा दादरकरांची तहान भागवणार! )

राज्य सार्वजनिक बांधकाम विभागात भरती 

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी १ हजार ५३६ जागा रिक्त असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी -२ व कनिष्ठ अभियंत्यांची एकूण १ हजार २४० पदे रिक्त आहेत. ही रिक्ते पदे भरणे आवश्यक आहेत त्यामुळे, या एकूण २ हजार ७७६ पदासांठी राज्यात लवकरच भरती निघणार आहे. या पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.